किचकट प्रक्रियेमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत: बाळासाहेब थोरात 

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

सध्याच्या सरकारला ग्रामीण भाग आणि शेतकर्‍यांशी काहीही देणे घेणे नाही. सरकारने कर्जमाफीची केवळ पोकळ घोषणा केली आहे. अवघड व किचकट प्रणालीमुळे अजूनही दोन वर्षे कर्जमाफी मिळणे अवघड वाटते. शेतकर्‍यांना मदत करतांना कमी जास्त पाहू नका.

तळेगाव दिघे (जि. नगर  : काँग्रेस सरकारच्या काळात शेतकर्‍यांना कुठेही अवघड प्रक्रिया न राबवता सरसकट कर्जमाफी देण्यात आली. मात्र सध्याच्या सरकारने घोषणाबाजी करत अवघड व किचकट ऑनलाईन प्रक्रिया राबविल्याने राज्यातील लाखो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचीत राहणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील वरुडीफाटा येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातर्फे उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन आ.थोरात यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आ.डॉ.सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, कृषी सभापती अजय फटांगरे, पं.स. समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, जि.प सदस्य रामहरी कातोरे, मिलींद कानवडे, आर.बी. राहाणे, लक्ष्मणराव कुटे, साहेबराव गडाख, मोहनराव करंजकर, सुनंदा भागवत, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, आनंदा गाडेकर उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, सध्याच्या सरकारला ग्रामीण भाग आणि शेतकर्‍यांशी काहीही देणे घेणे नाही. सरकारने कर्जमाफीची केवळ पोकळ घोषणा केली आहे. अवघड व किचकट प्रणालीमुळे अजूनही दोन वर्षे कर्जमाफी मिळणे अवघड वाटते. शेतकर्‍यांना मदत करतांना कमी जास्त पाहू नका. शेतकर्‍यांना हमीभाव द्या अशी मागणी आ. थोरात यांनी केली.

प्रसंगी बाळासाहेब शिंदे, रमेश गुंजाळ, अवधूत आहेर, संतोष मांडेकर, विलास कवडे , बापूसाहेब गिरी, बापू जाधव, रेवजी नाना घुले, सुहास वाळुंज, गणेश सुपेकर, तुळशीराम भोर, अर्जुेन घुले, इंद्रजीत खेमनर, भास्कर पानसरे, गोपीनाथ आगलावे, विनायक फटांगरे, एम.एम.फटांगरे, संदीप भागवत, तुकाराम फटांगरे उपस्थित होते.
 प्रास्ताविक राघू जाधव यांनी केले, सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.

Web Title: Nagar news Congress leader Balasaheb Thorat talked about farmer loan waiver