विश्‍वस्तांना मारहाण; पंधरा जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नगर - श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या दोन विश्‍वस्तांना मारहाण करून ऐवज पळविल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिसांनी 15 जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नगर - श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या दोन विश्‍वस्तांना मारहाण करून ऐवज पळविल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिसांनी 15 जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत नितीन श्रीनिवास जोगळेकर (रा. सदाशिव पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली. सावेडीतील दत्त मंदिर देवस्थानाचे जोगळेकर व राजन जोशी विश्‍वस्त आहेत. ते काल (ता. 10) सहकाऱ्यांसोबत येथे आले होते. त्या वेळी काही जणांनी त्यांना राजीनामा देण्यासाठी दबाव आणून शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांच्याकडील सोन्याची चेन व रोख रक्कम पळविली. या दोन्ही विश्‍वस्तांना काल येथे कोंडल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Web Title: nagar news crime on 15 persons