अकोले: टाकळकर वाडा संस्काराचे विद्यापीठ: डॉ. लीला गोविलकर

Akole
Akole

अकोले : भारतीय संस्कृतीने स्त्रीशक्तीची विविध रूपात नेहमी उपासना केली आहे. आपल्या देशभरात आदिशक्तीची ५१ शक्तिपीठं आहेत. त्यातील साडेतीन पीठं पुण्यभूमी महाराष्ट्रात आहेत. मात्र स्त्री शक्तीचा जागर करीत असताना प्रत्येक स्त्री साडेतीन पीठांपैकी एक आहे. तिच्यातील आत्मविश्वास व शक्तीमुळे ती आपल्या कुटुंबाचा पाय भक्कमपणे उभारून परिस्थिती संकट न समजता आव्हान समजून पुढे जात आहे असे सांगतानाच कर्तव्य करता करता प्रमिला माई सारख्या कर्तुत्ववान महिला तयार होतात. या माईने आपल्या कुटुंबाबरोबरच वासुदेव कुटुंबम या उक्तीप्रमाणे समाजातील उपेक्षित घटकानाही संस्कार व न्याय देऊन आपला टाकळकर वाडा संस्काराचे विद्यापीठ्च तयार करून समाजापुढे संस्काराचा आदर्श निर्माण केला. त्याचच हा संस्काराचा अमुल्य ठेवा भावी पिढीने पुढे जतन करावा, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. लीला गोविलकर यांनी अकोले येथे बोलताना केले.

आनंदोत्सव चॅरीटेबल ट्रस्ट प्रकाशन मंच नगर यांच्या विधमाने ऋषी लोपामुद्रासार्थक जीवन गौरव पुरस्कार शनिवारी ऋषीपंचमीचे औचित्य साधून अकोले येथे हा पुरस्कार श्रीमती प्रमिला पुरुषोत्तम टाकळकर यांना जेष्ठ विचारवंत डॉ. लीला गोविलकर यांच्या शुभ हस्ते व साहित्यिक व विचारवंत  प्रा. मीरा पटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश टाकळकर यांच्या निवासस्थानी पुरस्कार देण्यात आला. यावेळी पाहुण्याचा परिचय आनंदोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अनिल सह्स्र्बुध्ये यांनी करून दिला. तर स्वागत जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर यांनी केले. यावेळी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानपत्राचे वाचन डॉ. अनिल सह्श्र्बुध्ये यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रा. भीमराज पटारे होते प्रसंगी अनिल सोमणी, रोहिणी टाकळकर, मोहिनी टाकळकर, प्रतिभा सोमण, हर्षल सोमण, पुंडलिक गवंडी आदींनी आपले भावना व्यक्त केल्या.

प्रसंगी बोलताना संत साहित्यिक डॉ. लीला गोविलकर यांनी स्री शक्तीबाबत समाजातील अनेक स्रियांचे उदाहरणे देऊन महिलांनी आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून व महिलांनी व मुलीनी निर्भय बनावे. तर साहित्यिक प्रा. मिरा पटारे यांनी तुका म्हणे देवा घडो त्यांची सेवा या शब्दात आजच्या प्रसंगाचे वर्ण न मी करेन. प्रमिला माई आपण सर्वांना आभाळमाया दिली हा टाकळकर वाडा संस्काराचे विधापीठ व संस्कार मंदिर आहे. हे सर्वांच्या भाषणांमधून मला जाणवले यापेक्षा धन्यता ती कोणती.  हर्षल नातवाने आपल्या आजीचे सुंदर वर्णन केले. अगस्त्य ऋषींच्या पावनभूमीत आज आनंद ट्रस्टने विश्व्व्यापक विचार घेऊन हा ऋषी लोपामुद्रा सार्थक जीवन गौरव पुरस्कार प्रमिला माईंना देऊन पुरस्काराचा दर्जा वाढविला. प्रमिला माईंना टाकळकर बाबानी त्यांना प्रेरणा दिली नसती, पाठबळ दिले नसते तर माई काम करू शकल्या नसत्या. त्यामुळे यशस्वी महिलेच्या मागे पुरुष असतो. आता काळ बदलत आहे त्यामुळे विज्ञान व अध्यत्माची सांगड घालून जगले पाहिजे. आमच्या लोणावळा मनशक्ती आधात्मक केंद्रात स्त्रीयांबद्दल जे विचार मांडले जातात. विचार शक्ती मनशक्ती मध्ये पाच नमस्काराचे महत्व सांगितले आहे. हा मनशांती चा पहिला पाया  आहे. महिलांनी हा संस्कार जपावा. अगस्त्य ऋषींच्या भूमीत आज ऋषीपंचमीचे दिवशी ऋषी लोपामुद्रा सार्थक जीवन गौरव पुरस्कार कार्यक्रम म्हणजे दैव योगच म्हणावा लागेल अकोल्याच्या टाकळकर वाद म्हणजे आभाळमाया व संस्काराचे विधापीठ म्हटले तर वावगे ठरणार नाही.

अलीकडच्या काळात संस्कार हरवत चालले असून मोबाईलमुळे संस्कार बिघडला आहे कुठे गेली अंगत पंगत, खेळ, माया जिव्हाळा प्रेम या गोष्टी राहिल्या नाहीत. आई मुलाला गुण किती मिळाले हे आई विचारते. टीव्ही संस्कृती आई वडिलांपासून सुरु होते त्याचे बाळ कडू तुमच्याकडून मुले घेतात महिलांनो जाग्या व्हा मुलांना सांभाळा संस्कार द्या. सुत्रसंचलन डॉ. मालुंजकर यांनी तर आभार प्रशांत टाकळकर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com