जमिनीबाबत शरद पवार यांना निवेदन देणारः झावरे

सनी सोनावळे
बुधवार, 24 जानेवारी 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर): पारनेर तालुक्यातील ढवळपुरी, वनकुटे, गाजदीपुर, वडगाव सावताळ, पळशी या गावांतील जमिनी भारत सरकारच्या संरक्षण विभाग सरावासाठी आरक्षित करणार असून, याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड भिती व सभ्रंमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही जमीन आरक्षित न करण्यासाठी शरद पवार यांना निवेदन देणार आहे, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सांगितले.

'सकाळ'शी बोलताना झावरे म्हणाले, '1994 साली पवार हे देशाचे संरक्षण मंत्री असताना असाच प्रस्ताव संरक्षण विभागाने असाच प्रस्ताव ठेवला होता, त्यावेळी स्व. माजी आमदार वसंतराव झावरे यांनी याच गावांतील सरपंच व प्रमुख नागरिकांसह दिल्ली येथे पवार यांच्याकडे शिष्टमंडळाने नेऊन सदर क्षेत्र आरक्षित न करण्याबातचे निवेदन दिले होते. त्यावेळी पवार यांनी सदर क्षेत्र संरक्षण विभागाला आदेश देऊन सदर आरक्षणाला स्थगिती दिली होती.'

आज वीस वर्षांनी सदर प्रश्न उद्भवला आहे. पवार यांच्या शब्दाला आजही केंद्र सरकारमध्ये मान असल्यामुळे शनिवारी (ता. 27) वासुंदे येथील शेतकरी मेळाव्यात हा प्रश्न उपस्थित करून याबाबत पवार यांच्याकडे साकडे घालणार आहे.

Web Title: nagar news farmer land issue sharad pawar and sujit zawre