'शेतमालाच्या हमिभावासाठी सरकारशी टोकाचा संघर्ष करू'

सनी सोनावळे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

टाकळी ढोकेश्वर (नगर): शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफीबरोबरच शेतमालाला हमिभाव मिळणे आवश्यक आहे, तो मिळवण्यासाठी नजिकच्या काळात भूमिपुत्र शेतकरी संघटना सरकारविरोधात टोकाचा संघर्ष करील, असा ईशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिला.

सावरगाव (ता. पारनेर) येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापनेच्या कार्यक्रम वाडेकर यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक आंधळे, उद्योजक प्रकाश चिकणे, तालुकाध्यक्ष सचिन सैद उपस्थित होते.

वाडेकर म्हणाले, 'राज्यातील शेतकरी जोपर्यंत संघटित होत नाही तो पर्यंत सरकार झुकणार नाही. त्यामुळे भूमिपुत्र शेतकरी संघटनेची गाव तेथे शाखा स्थापन करून शेतकरी चळवळ अधिक व्यापक व प्रभावी करणार आहे.'

अनिल देठे यांनी सरकारची कर्जमाफी योजना फसवी असून, प्रत्यक्षात ती मिळते कि नाही याबाबत हि साशंकता असल्याचे सांगतीले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nagar news fight against the government for the humiliation of the farming