शॉर्टसर्किटने आग लागून कार जळून खाक !

हरिभाऊ दिघे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

अमित भाऊसाहेब इंगळे ( रा. मोशी, ता. हवेली जि. पुणे ) व विक्रम सोमनाथ ढोणे ( रा. पिंपळे ) हे नान्नजदुमाला येथून पिंपळे येथे प्रवास निसान कारमधून ( क्र. एमएच १४ एफसी १९३९ ) प्रवास करीत होते.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपळे शिवारातील रस्त्यावर वायरिंग शॉर्टसर्किट होत निसान सनी कारने पेट घेत जळून खाक झाली. शनिवारी ( ता. २१ ) रात्री साडेअकराच्या सुमारास लोणी - नांदूरशिंगोटे रस्त्यावर ही दुर्घटना घडली. सुदैवाने कारमधील दोघेजण बचावले.

अमित भाऊसाहेब इंगळे ( रा. मोशी, ता. हवेली जि. पुणे ) व विक्रम सोमनाथ ढोणे ( रा. पिंपळे ) हे नान्नजदुमाला येथून पिंपळे येथे प्रवास निसान कारमधून ( क्र. एमएच १४ एफसी १९३९ ) प्रवास करीत होते. दरम्यान शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपळे शिवारात कारच्या वायरिंगचे शॉर्टसर्किट होत पेट घेत आग लागली. त्यानंतर तात्काळ अमित इंगळे व विक्रम ढोणे कारच्या बाहेर पडल्याने बचावले. त्यानंतर अमित इंगळे यांनी पोलिसांत खबर दिली. आगीत अंदाजे नऊ लाख किंमतीची निसान कार जळून खाक झाली.

पो. हे. कॉ. किशोर पालवे यांनी घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. किशोर पालवे अधिक तपास करीत आहे.

Web Title: nagar news fire on car