सरकारी कार्यालयांना नगर जिल्ह्यात टाळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नगर - जिल्ह्यात शेतकरी संपाची तीव्रता मंगळवारी थोडी कमी झाल्याचे दिसले. जिल्ह्यातील विविध भागांत शेतकरी व अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय, तलाठी व मंडलाधिकारी कार्यालये, पंचायत समिती, कृषी कार्यालये यांना टाळे ठोकले. दूध, भाजीपाला घेऊन जाणारी वाहने काही ठिकाणी अडविण्यात आली.

अनेक गावांचे आठवडे बाजार बंद राहिले. नगर तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे नेते अजय महाराज बारस्कर यांनी कीर्तन करून सरकारचा निषेध केला. पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्‍वर येथे पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वडनेर येथे एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न झाला. चालक-वाहकांसह गावकऱ्यांच्या दक्षतेने अनर्थ टळला.

(मुद्दे)
- विविध सरकारी कार्यालयांना कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकले
- राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचे उपोषण मागे
- पारनेर तालुक्‍यात एसटी बस जाळण्याचा प्रयत्न
- अनेक गावांचे आठवडे बाजार बंद
- बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली

Web Title: nagar news government office lock by farmer organisation