नगर : बेकायदा देशीदारू वाहतूक करणारी गाडी पकडली

हरिभाऊ दिघे 
शनिवार, 29 जुलै 2017

नशिक ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरून संगमनेर तालुक्याच्या हद्दीतील निमोण फाटा शिवारात शुक्रवारी ( ता. २८ ) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास एका छोटा हत्ती गाडीतून ( क्र. एमएच १२ एचएफ ८३२५ ) देशीदारूचे २५ बॉक्स देशी व विदेशी दारूच्या एक बॉक्सची बेकायदा वाहतूक केली जात होती.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने निमोण फाटा ( ता. संगमनेर ) शिवारात बेकायदा देशी व विदेशी दारूच्या बॉक्सची वाहतूक करणारी छोटा हत्ती गाडी पकडली. या गाडीतून देशीदारूचे २५ बॉक्स व विदेशी दारूचा एक बॉक्स मिळून ६९ हजार १२० रुपये किंमतीची दारू हस्तगत करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

नशिक ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरून संगमनेर तालुक्याच्या हद्दीतील निमोण फाटा शिवारात शुक्रवारी ( ता. २८ ) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास एका छोटा हत्ती गाडीतून ( क्र. एमएच १२ एचएफ ८३२५ ) देशीदारूचे २५ बॉक्स देशी व विदेशी दारूच्या एक बॉक्सची बेकायदा वाहतूक केली जात होती. याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदशनाखाली पो. नाईक अनिल जाधव, आंनद धनवट, शंकर आहेर, पो. कॉ. बाबासाहेब खेडकर यांच्या पथकाने सदर छोटा हत्ती गाडी पकडली. या एक लाख रुपये किंमतीच्या गाडी व ६९ हजार १२० रुपये किंमतीची दारू असा १ लाख ६९ हजार १२० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

दारू वाहतूक करणाऱ्या बाबासाहेब दत्तु थोरात (वय ३४) व वैभव दत्तात्रय गवळी (वय २३ दोघेही रा. वडगावपान ता. संगमनेर) यांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पो. कॉ. बाबासाहेब खेडकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध अवैध दारू वाहतूक प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Nagar news illegal liquor van seized