शेतकरी कर्जमुक्ती परिषदेसाठी मोठ्या संख्येत शेतकरी सहभागी होणारः अनिल देठे

सनी सोनावळे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

टाकळी ढोकेश्वर (नगर): शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासंह अन्य शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत जळगाव येथे सुकाणू समितीने आयोजीत केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती परिषदेसाठी मोठ्या संख्येत शेतकरी सहभागी होणार असल्याची माहीती समितीचे सदस्य व भुमिपुत्र संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे यांनी दिली.

शेतकरी संघटनांच्या राज्य सुकाणू समितीने मंगळवारी (ता. २६) जळगाव येथे शेतकरी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन केले आहे, त्याबाबत देठे यांनी आज 'सकाळ'शी बोलताना ही माहीती दिली.

देठे म्हणाले, 'राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार नाही. शेतमालाच्या हमिभावाबाबतही केंद्र व राज्य सरकारने कुठलीच भुमिका जाहीर केलेली नसल्यामुळे या मागण्या मान्य होईपर्यंत सुकाणू समितीचा सरकारविरोधात संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या अनुषंगाने शेतकरी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष
रघुनाथ पाटील, डॉ.अजित नवले, कामगार नेते बाबा आढाव, भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर हे उपस्थित राहुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: nagar news jalgaon farmer waiver and anil dethe