जलयुक्त शिवार योजनेमुळे दुष्काळी ओळख पुसली: विजय औटी

सनी सोनावळे
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

टाकळी ढोकेश्वर (नगर): यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतून भरीव निधी मिळाला, त्यातून बंधारे, समतोल चर, नाला बिल्डींगचे कामे झाली. वाहुन जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरल्याने परिसरातील भुजळ पातळी वाढली. जलयुक्त शिवार योजनेमुळे पारनेर तालुक्याची दुष्काळी ओळख पुसली, असे मत आमदार विजय औटी यांनी केले.

मांडओहळ (ता. पारनेर) धरणातील पाण्याचे जलपुजन आमदार औटी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, सभापती राहुल झावरे, पंचायत समिती सदस्या सरूबाई वाघ, सरपंच साहेबराव वाफारे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख, उपअभियंता रामराजे भोसले, बापू शिर्के उपस्थित होते.

औटी म्हणाले, 'या योजनेतुन कृषी विभागाने २२७ छोट्या मोठ्या बंधाऱ्यांची कामे केली, त्याचा खरा फायदा आता शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. उन्हाळी पिकांना यावर्षी पाण्याचा तुडवडा जाणवणार नाही. टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या तालुक्याची ओळख नाहीशी झाली आहे.'

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar news jalyukt shivar yojana and vijay auti