कर्जतमध्ये गस्तीवरील पोलिसांच्या गाडीवर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

चोरून गायी नेणारी पिकअप थांबवण्यासाठी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.

कर्जत : कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे गस्त घालत असलेल्या पोलिसांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. खांद्याला गोळी लागून एक पोलिस कर्मचारी जखमी, 

मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पिकअपमध्ये चोरून गायी नेत असल्याने पोलिसांनी पिकअप थांबवण्यासाठी पाठलाग केला असता, पोलिसांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली.

पोलिस गाडीच्या चालकाला गोळी लागल्याने गंभीर जखमी पोलिसावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: nagar news karjat firing at police patrolling vehicle