काष्टी रेल्वे लूट प्रकरणात दोन संशयित ताब्यात

संजय आ. काटे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

रेल्वे लुटीत सोलापूर कनेक्शन 

श्रीगोंदे (नगर) : शुक्रवारी रात्री काष्टी रेल्वे स्थानकावर दगडफेक करतानाच आतील आरोपींनी रेल्वेतील प्रवाशांची लूट केल्याप्रकरणी दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना श्रीगोंदे पोलिसांनी पवारवाडी (लिंपणगाव) शिवारात ताब्यात घेतले. या दोघांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी सोलापूर कनेक्शन पुढे येत आहे. 

पुणे - बिलासपूर ही रेल्वे २७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास काष्टी स्थानकाजवळ थांबवून प्रवाशांची लूट केली होती. या लुटीत सुमारे दोन लाख रूपयांचा ऐवज चोरण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही टोळी सोलापूर जिल्ह्यातील असून यात श्रीगोंदे तालुक्यातील स्थानिक आरोपींचा सहभाग आहे. गुन्हा घडल्यापासुन रेल्वे व श्रीगोंदे पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर होते. 
या गुह्यातील दोन संशयित आरोपी लिंपणगाव येथील पवारवाडीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे लिंपणगाव येथेही रेल्वे फाटक असून तेथेही यापूर्वी अनेकवेळा रस्तालूट झाली आहे. पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. एक आरोपी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरातील तर दुसरा पवारवाडी येथील आहे. या दोन्ही संशियताना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातून जे आरोपी आले होते त्यांनी त्यांच्याकडील दुचाली निमगावखलू येथील एका उसाच्या शेतात लपविल्या होत्या. रेल्वे लूट करुन नंतर त्यांनी या दुचाकींवर इच्छित स्थळ गाठले. त्यापूर्वी लुटीनंतर रेल्वे पोलिसांनी हवेत गोळीबार गेल्याने आरोपी तेथून पसार झाले. लूट झालेल्या एका मोबाईल लोकेशन रेल्वे पोलिसांना मिळाले. ते पेडगाव-शेडगाव भागातील होते. त्यानूसार श्रीगोंदे पोलिसांनी माहिती काढून या दोघा संशयीतांना ताब्यात घेतल्याचे समजले. निरीक्षक पोवार यांनी दोन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nagar news kashti railway robbery suspect held