'कायनेटिक'चे सील काढण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नगर - थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी कायनेटिक कंपनीला नव्याने नोटीस देऊन त्यावर सुनावणी घ्यावी. सुनावणीत होणाऱ्या तडजोडीनुसार कंपनीस नव्याने बिल देऊन त्यानुसार करआकारणी करण्यात यावी. तत्पूर्वी महापालिकेने कंपनीस केलेले सील तत्काळ काढावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज दिले.

महापालिकेच्या कर विभागातर्फे मालमत्ताकर वसुलीसाठी काही मालमत्ता 15 सप्टेंबरला "सील' केल्या होत्या. त्यात मुदतीत कर न भरलेल्या मालमत्तांचा 11 व 12 ऑक्‍टोबरला लिलाव करण्याचे महापालिकेने जाहीर केले होते. त्यामध्ये नटराज हॉटेल, कायनेटिक कंपनी व महेश सिनेमा हॉल आदी नगरमधील महत्त्वाच्या मालमत्ताधारकांचा समावेश होता.

आयुक्त घनश्‍याम मंगळे यांच्या आदेशानुसार उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांनी करवसुलीसाठी गेल्या वर्षी 14 सप्टेंबरपासून नगरमधील मालमत्ता "सील' करण्याची धडक मोहीम सुरू केली होती.

Web Title: nagar news kinetic company seal court