नातेवाईक असल्याने गुन्ह्यात गोवले - ऍड. प्रकाश आहेर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नगर - आरोपी जितेंद्र शिंदे याचा नितीन भैलुमे नातेवाईक असल्याने त्याला कोपर्डीतील बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याचा गुन्ह्याशी थेट संबंध असल्याचा सरकार पक्षाकडे पुरावा नसल्याचा युक्तिवाद ऍड. प्रकाश आहेर यांनी केला.

नगर - आरोपी जितेंद्र शिंदे याचा नितीन भैलुमे नातेवाईक असल्याने त्याला कोपर्डीतील बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याचा गुन्ह्याशी थेट संबंध असल्याचा सरकार पक्षाकडे पुरावा नसल्याचा युक्तिवाद ऍड. प्रकाश आहेर यांनी केला.

विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुनावणी सुरू असलेल्या या खटल्यात ऍड. आहेर यांनी अंतिम युक्तिवाद केला. ते म्हणाले, 'गुन्ह्याची पार्श्‍वभूमी असलेल्यांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरू नये. आरोपींना नार्को टेस्टसाठी मुंबईला नेल्याचे तपासी अधिकारी सांगत असले, तरी नार्को टेस्टचा अहवाल चार्जशीटमध्ये का जोडला नाही?''

तत्पूर्वी, आरोपी संतोष भवाळतर्फे युक्तिवाद करताना ऍड. विजयालक्ष्मी खोपडे म्हणाल्या, 'कर्जत पोलिस निरीक्षकांकडून गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. मात्र, त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने तपास करून आरोपींची संख्या वाढविली. त्यांच्याविरुद्ध खोटे पुरावे तयार केले. प्रत्यक्षात व फिर्यादीनुसार पीडित मुलीची तीन नावे समोर आली. स्टेशन डायरीच्या नोंदीत पीडितेचे नाव वेगळेच आहे. दोषारोपपत्रासोबत दिलेल्या स्टेशन डायरीवर पोलिस अधीक्षकांचे शिक्केच नाहीत.''

आरोपीची मोटरसायकल जळाल्याची स्टेशन डायरीला काहीच नोंद नाही. त्याचा गुन्हाही पोलिसांनी नोंदविलेला नाही. आरोपी भवाळ कोपर्डीचा असल्याचा ठोस पुरावाच नाही. दोषारोपपत्र दाखल होण्यापूर्वीच सरकारने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली, ही बाबही आक्षेपार्ह आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी त्यांना साहाय्य केले.

आहेर यांचा पुढील युक्तिवाद आणि खटल्याची पुढील सुनावणी ता. आठ व नऊ रोजी होणार आहे.

Web Title: nagar news kopardi rape case