संगमनेर: गळफास घेवून वृद्धाची आत्महत्या

हरिभाऊ दिघे 
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पिंपरणे येथील रहिवाशी किसन देवराम मरभळ यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. परिसरातील रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे शिवारातील वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत एका वृद्धाने आत्महत्या केली. किसन देवराम मरभळ ( वय ६२ ) असे या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. मंगळवारी ( ता. २६ ) सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

पिंपरणे येथील रहिवाशी किसन देवराम मरभळ यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. परिसरातील रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मयत किसन मरभळ यांचा मृतदेह घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविला.

याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमागील कारण मात्र गुलदस्त्यात आहे. पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. रविंद्र कुलकर्णी अधिक तपास करीत आहे.

Web Title: Nagar news man suicide in Sangamner