आमदार जगतापसह चौघांना कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नगर - केडगाव येथील शिवसेना उपप्रमुखांसह दोघांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना आज पहाटे अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवस (ता. 12) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणी एकूण तीस जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

आमदार जगताप, संदीप गुंजाळ ऊर्फ डोळसे (वय 29, रा. नेप्ती रस्ता, केडगाव), बाळासाहेब एकनाथ कोतकर (वय 59, रा. एकनाथनगर, केडगाव), भानुदास महादेव कोतकर ऊर्फ बीएम (रा. शाहूनगर, केडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संग्राम संजय कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संग्राम जगताप, अरुण जगताप व शिवाजी कर्डिले या तीन आमदारांसह 30 जणांविरुद्ध कटकारस्थान करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आज पहाटे तीन वाजता आमदार संग्राम जगताप यांच्यासह दोघांना अटक केली. आरोपी संदीप गुंजाळ स्वत: पारनेर पोलिस ठाण्यात हजर झाला होता. आज दुपारी एक वाजता चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले. 

जगताप, कर्डिले यांचा शोध सुरू 
आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली; मात्र आमदार अरुण जगताप आणि आमदार शिवाजी कर्डिले यांचा शोध पोलिस घेत आहेत. शोधासाठी पोलिसांची पथके रवाना केल्याचे सांगण्यात आले.

Web Title: nagar news MLA sangram jagtap police custody