सरकार लोकांना विश्‍वास देऊ शकत नाही: अजित पवार

सूर्यकांत नेटके
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नगर : राज्यात आणि देशातील परिस्थिती गंभीर आहे. मात्र "हे सरकार आहे' असा विश्‍वास सत्ताधारी देऊ शकले नाहीत. विश्‍वास देण्याची त्यांची कुवतही नाही. त्यामुळे शेतकरी, कामगार, तरुण, समान्य नागरिक, महिला कोणीच समाधानी नाही. भ्रष्टाचारमुक्तीऐवजी राजरोसपणे मोठे लोक बॅंका बुडवत आहेत, घोटाळे होत आहेत, सीमेवर सैनिक मरत आहेत, असे असताना केंद्रातील कोणीच जबाबदार व्यक्ती बोलत नाही. सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी केला. जातीवादी पक्षाला बाजूला ठेवून समाविचारी पक्षांसोबत विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका लढवण्याची माणसिकता असल्याचे यांनी स्पष्ट केले.

हल्लाबोल यात्रेसाठी शेवगावला जाताना पवार यांनी नगरला पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, सुजीत झावरे, माणिक विधाते यावेळी उपस्थित होते. पवार यांनी सरकारच्या कारभारावर कडाडून टीका केली, ते म्हणाले, केंद्रात शरद पवार कृषीमंत्री असताना दुष्काळ, गारपीट किंवा अन्य कोणत्याही संकटाने शेतकरी कोलमडला तर त्याला आधार देण्याचे काम सरकार करत होते. शरद पवार यांच्या काळातच शेतकऱ्यांना दोन टक्‍क्‍यापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय झाला. संशोधनाला अधिक निधी दिला. दुधाला दर नव्हता तर दुध पावडर करण्यासाठी आमच्या सरकारने अनुदान दिले. अन्नधान्य निर्यातीला प्राधान्य दिले. त्यामुळे शेतकरी आनंदी आणि समाधानी होता. आता मात्र शेतकऱ्यांना जगणं महाग झालय. किमान आधारभूत दर देण्याची घोषणा निव्वळ दिशाभूल आहे. कर्जमाफी हे फक्त नाटक असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. बोंडअळीच्या नुकसानीची मदत, तुडतुड्यामुळे धानाचे नुकसान झाले, त्यांना मदत न देता केवळ खोटी आश्‍वासने सरकाने दिली आहेत. सध्याची राज्याची आणि देशाची स्थिती गंभीर आहे. अशीच परिस्थिती राहीली तर देश आणि राज्य खूप मागे जाईल. भाजप व शिवसेना हे पक्ष आमचे विरोधक असून त्यांच्या विरोधात समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचे प्लानिंग वरिष्ठ पातळीवर केले जात आहे.

सरकारची हुकुमशाहीकडे वाटचाल
लोकांवर अन्याय करण्याच्या भूमिकेतून पोलिस निरिक्षक खोटे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देता, पोलिसच तरुणांला मारुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, महिला पोलिस अधिकारी गायब होते, महिला, मुलीवर अत्याचार होते, दरोडे, खून चालूच आहेत. राज्यात कोणी सुरक्षीत नसेल तर ही चिंतेची बाब आहे. सरकारचा दरारा नसल्याचे यातून दिसते. समाजातील एकही घटक समाधानी नाही. त्यात मंत्री लोकांना मॅनेज करण्यासाठी पैसे वाटण्याचा सल्ला देतात, कोणाला बोलू दिले जात नाही, आणि एकूनही घेतले जात नाही. ही हुकुमशाहीकडे वाटचाल असल्याचे पवार यांनी म्हटले.

ती भूमिका फक्त चार महिन्यासाठी
पवार म्हणाले, ""विधानसभेच्या निवडणूका झाल्यावर कोणालाच बहूमत नव्हते. त्यावेळी पुन्हा निवडणूका घेणे राज्याला परवडणारे नव्हते. त्यामुळे भाजपला त्यावेळी दिलेला पाठिंबा ही भूमिका केवळ चार महिन्यासाठी होती. त्यानंतर त्यावर कुठली चर्चाही झाली नाही. शिवसेना तर शंभर वेळा राजीनाम्याचा भाषा करुनही सत्तेला चिटकून बसली आहे. आम्हीही सत्तेत होतो, नवीन जिल्हा तयार करण्याचे सोपे काम नाही. नगरसह कोणत्याच जिल्ह्याचे हे सरकार विभाजन करणार नाही. आतापर्यंत लोकांना दिलेले कोणतेही अश्‍वासन या सरकारने पाळले नाही, त्यामुळे हेही अश्‍वासन पाळले जाणार नाही. जिल्हा विभाजनाची चर्चा म्हणजे केवळ "चुनावी जुमला' आहे.''

Web Title: nagar news ncp ajit pawar government