संगमनेर : 'स्वाईन फ्ल्यू’ने कृषी सहाय्यकाचा मृत्यू

हरिभाऊ दिघे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

रमेश सोपान गडाख यांना चार दिवसांपासून ताप येत होता. त्यांच्यावर संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र स्वाईन फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळ्याने रमेश गडाख यांना नाशिक येथील सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी पहाटे पाचच्या सुमारास उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तळेगाव दिघे ( जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पारेगाव गडाख येथील रमेश सोपान गडाख ( वय ३५ ) या कृषी सहायक असलेल्या युवकाचा स्वाईन फ्ल्यू आजाराने रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला.

अकोले तालुक्यातील शेरणखेल येथे ते कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते. या दुर्दैवी घटनेने पारेगाव गडाख गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबतची माहिती अशी : रमेश सोपान गडाख यांना चार दिवसांपासून ताप येत होता. त्यांच्यावर संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र स्वाईन फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळ्याने रमेश गडाख यांना नाशिक येथील सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी पहाटे पाचच्या सुमारास उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजयी, पत्नी व तीन महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात पारेगाव गडाख येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळावू स्वभावाच्या युवकाच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने पारेगाव गडाख गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Nagar news one person dead on swine flu