पळशी ग्रामपंचायतच्या शिवसेनेच्या चार जागा बिनविरोध

सनी सोनावळे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

टाकळी ढोकेश्वर (नगर): ग्रामपंचायत निवडणुकीत फॉर्म भरण्याची आज (शनिवार) अंतिम मुदत होती. पळशी (ता. पारनेर) येथील निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार जागांना उमेदवार न मिळाल्याने शिवसेनेच्या गटाच्या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेचे पारडे जड झाले आहे.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीप्रमाणे वार्ड क्रमांक 1 (माळवाडी) बबिता एकनाथ चिकणे, वार्ड क्रंमाक 2 (गावठाण) शिवाजी राजू गायकवाड, वार्ड क्रमांक 4 (मटारकार) राधाबाई रामदास चिकणे, वार्ड क्रमांक 5 (गाड्याचा झाप) कविता पाराजी जाधव असे चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

पळशी ग्रामपंचायत एकुण 13 सदस्य व सरपंच अशा 14 जागांसाठी ही निवडणूक होणार असून, सद्यस्थितीत या ग्रामपंचायत मध्ये सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचा व उपसरपंच शिवसेनेचा अशी आहे.

आमदार विजय औटी यांनी केलेल्या विकासकामांमुळे व त्यांनी पाठपुरावा करून अदिवासी समाजाला आपल्या जमिनींचा हक्क मिळाल्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे, असे शिवसेनेचे पॅनल प्रमुख व उपसरपंच अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.

Web Title: nagar news palashi gram panchayat election and shivsena