टाकळी ढोकेश्वर येथील एकाचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मृत्यू

सनी सोनावळे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

स्वाईन फ्लू सदृश आजारांत वाढ झाल्याचे चित्र

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील बाळासाहेब सूर्यकांत भालेराव (वय ५२) यांचा स्वाईन फ्लु सदृश आजाराने गुरूवारी (ता. ०७) रोजी सकाळी मृत्यू झाला आहे. नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात दिवसेंदिवस स्वाईन फ्लू सदृश आजारातील रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.  

आरोग्य यंत्रणेमार्फत या आजाराबाबत उपाययोजना अथवा जनजागृती करताना हा विभाग दिसुन येत नाही. या अगोदरही  मागील महिन्यात टाकळी ढोकेश्वर येथील गांधी नावाच्या इसमाचा स्वाईन फ्लुने पुणे येथे उपचार दरम्यान मृत्यु झाला होता. त्यानंतर पुन्हा अनेक रुग्ण टाकळी ढोकेश्वर व परिसरात आढळून आले असुन सध्या काही रूग्ण नगर व पुणे याठिकाणी खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. पारनेर तालुक्यातील अनेक गावात पावसामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असुन साथींच्या आजाराने अनेक गावे त्रस्त झाली आहे. या साथीच्या आजाराने अनेक रूग्ण ताप, डेंगूयु,मलेरिया व टायफाईडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

याबाबत डाॅ. भाऊसाहेब खिलारी म्हणाले या आजाराबाबत लोकांनी स्वतः जागृत राहुण काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, स्वच्छता ठेवणे,हात धुणे सर्दी,खोकला असल्यास मास्क वापरून दवाखान्यात जाऊन त्वरीत उपचार घेणे गरजेचे आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

Web Title: nagar news parner swine flu death