नगर तालुक्‍यात दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नगर - मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी शहरासह नगर तालुक्‍यात आज सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. एमआयडीसीतील महापारेषणच्या उपविभागातील एक फीडर बंद पडल्याने सावेडी भाग बराच वेळ अंधारात होता. उर्वरित शहरातही बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे सखल भागात पाणी साचले.

कार्यालये सुटण्याच्या वेळी सायंकाळी पावसाला सुरवात झाली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. अनेकांकडे रेनकोट किंवा छत्री नसल्याने पावसात भिजण्याचा आनंद घ्यावा लागला. शहरातील बऱ्याच ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. एमआयडीसीमधील महापारेषणच्या उपविभागातील एक फीडर बंद पडले, त्यामुळे सावेडी भागात अंधार झाला.

Web Title: nagar news rain in nagar

टॅग्स