काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी संगमनेर मध्ये जावेद तांबोळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

संगमनेर (नगर) संगमनेर तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी जावेद तांबोळी तर शहराध्यक्षपदी शशीकांत दायमा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

संगमनेर (नगर) संगमनेर तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी जावेद तांबोळी तर शहराध्यक्षपदी शशीकांत दायमा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांची निवड आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॅा. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अनीस शेख यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्षपदी धांदरफल बुद्रुक येथील युवा कार्यकर्ते जावेद तांबोळी तर शहराध्यक्षपदी शशीकांत दायमा यांची निवड करण्यात आली. यावेळी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अनिस शेख, स्वदेश उद्योग समुहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने, जिल्हा परीषद सदस्य रामहरी कातोरे, अनिल काळे, हाजी बालम तांबोळी, विठ्ठलराव डेरे, विजय कोल्हे, गुड्डू बेग, अफसर तांबोळी, अमोल महाले, आयाज खतीब, मोहसीन शेख, अफजल तांबोळी आदी उपस्थीत होते. या निवडीमुळे शिरूर तालुका तांबोळी समाजाचे अध्यक्ष युनूस तांबोळी यांनी त्यांचे अभीनंदन केले आहे. अल्पसंख्याक समाजासाठी यापुढे वेगवेगळे उपक्रम राबविणार आहे. काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी तरूणांना एकत्रीत करणार असल्याचे जावेद तांबोळी यांनी सांगितले.

Web Title: nagar news sangamner congress javed tamboli