आईसह चिमुरड्याचा मृतदेह विहिरीत आढळला

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

संगमनेर तालुक्यातील घटना ; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील कौठे धांदरफळ शिवारातील विहिरीत आईसह तीन वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. हे दोघेही तीन दिवसांपासून बेपत्ता होते. योगिनी दिपक खतोडे (वय २९) व अभिराज दिपक खतोडे (वय ३, दोघे रा. राजापुर, संगमनेर) असे मयत आई व चिमुरड्याचे नाव आहे.

राजापूर याठिकाणी दिपक खतोडे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. पत्नी योगिनी खतोडे व मुलगा अभिराज खतोडे हे दोघेही रविवारी (ता. १८) दुपारी चार वाजेच्या सुमारास बेपत्ता झाले होते. तशा आशयाची तक्रार पती दिपक निवृत्ती खतोडे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. या दोघांचा शोध घेतला असता ते कुठेही आढळून आले नव्हते. दरम्यान, मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास कौठे धांदरफळ शिवारातील नदीच्या कडेला असणाऱ्या रमेश अर्जुन मोरे यांच्या विहिरीमध्ये योगिनी व अभिराज या दोघांचेही मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मोरे यांनी दूरध्वनीवरुन तालुका व शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात हलविले. याप्रकरणी रमेश मोरे ( रा. वडगाव लांडगा) यांनी खबर दिली. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाळासाहेब घोडे अधिक तपास करीत आहे.

पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
चिमुरड्यासह मृतावस्थेत विहिरीत सापडलेल्या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी प्रथम संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मात्र मयत योगीनी खतोडे हिचा भाऊ दत्तात्रय कर्पे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात छळाची व आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार योगीनीचा पती दिपक खतोडे व त्याची पहिली पत्नी मनिषा खतोडे, सासरा निवृत्ती खतोडे, सासु अंजनाबाई खतोडे, नंदाई भाऊसाहेब कर्पे व नणंद मनिषा कर्पे यांच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम ४९८ (अ) व ३०६ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: nagar news sangamner mother child body found in well