श्रीगोंदयातील सगळ्याच सरकारी इमारतींची तपासणी सुरू

संजय आ. काटे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

काष्टी शाळा इमारत गळती प्रकरणी ठेकेदाराला नोटीस

श्रीगोंदे (जिल्हा नगर) : तालुक्यातील प्राथमिक शाळांसह सगळ्याच सरकारी इमारतींची पथकांनी तपासणी सुरु केली असून, तीन दिवसात अहवाल देण्यास बजाविण्यात आले आहे. दरम्यान काष्टी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरावस्था पुढे आल्यानंतर संबधीत ठेकेदाराला नोटीस बजाविणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अलका शिरसाठ यांनी दिली.

काष्टी शाळा इमारत गळती प्रकरणी ठेकेदाराला नोटीस

श्रीगोंदे (जिल्हा नगर) : तालुक्यातील प्राथमिक शाळांसह सगळ्याच सरकारी इमारतींची पथकांनी तपासणी सुरु केली असून, तीन दिवसात अहवाल देण्यास बजाविण्यात आले आहे. दरम्यान काष्टी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरावस्था पुढे आल्यानंतर संबधीत ठेकेदाराला नोटीस बजाविणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अलका शिरसाठ यांनी दिली.

तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. निंबोडी घटनेनंतर बहुतेक शाळांची पावसाळ्यातील गळती, भिंतीच्या भेगा गावकऱ्यांच्या लक्षात येत आहेत. तालुक्यातील बहुतेक सगळ्याच गावातून अशा तक्रारी येवू लागल्याने गटविकास अधिकारी शिरसाठ यांनी शाळा इमारतीसह सगळ्याच सरकारी इमारतींची चौकशी करण्याचा निर्णय घेवून कार्यवाही सुरु केली आहे.

त्या म्हणाल्या, प्राथमिक शाळांच्या तक्रारी वाढल्या असतानाच गावातील सरकारी इमारतींची नेमकी स्थितीही समजून घेत आहोत. त्यासाठी बांधकाम, शिक्षण व आरोग्य विभागातील अठरा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या समवेत कर्मचारीही आहेत. तालुक्यातील आढळगाव, कोळगाव, काष्टी, बेलवंडी, मांडवगण व येळपणे या गटात अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शासकीय इमारतींची सद्यस्थिती तपासून त्याबाबत वस्तूनिष्ठ अहवाल तीन दिवसात सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अहवाल वेळेत सादर न करणाऱ्या पथकावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात येईल असेही बजाविण्यात आले आहे.
काष्टी येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीची 'सकाळ'ने आज पुढे आणलेली परिस्थिती तपासण्यासाठी पथक पाठवले आहे. सदर काम चार-पाच वर्षांपुर्वीचे असतानाही हा गोंधळ असल्याने इमारतीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला व तत्कालिन मुख्याध्यापकांना नोटीस काढून खुलासा मागणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

Web Title: nagar news Shrigonda All the government buildings are under investigation