कर्नाटकातून 4.5 किलो गांजा आणणारे सख्खे भाऊ श्रीगोंद्यात पकडले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

श्रीगोंदे, (नगर) : कर्नाटक राज्यातून विक्रीसाठी आणलेला ४५ हजार रुपये किंमतीचा चार किलो ८०० ग्रॅम गांजा पोलिसांनी पकडला. श्रीगोंदा फॅक्टरी येथे ही कारवाई झाली. या प्रकरणी टेंभुर्णी जिल्हा सोलापूर येथील दोघांना पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. 

या प्रकरणी पोलिसांनी विजय राजाराम साळवे (वय-३० ) व त्याचा भाऊ भीमराव राजाराम साळवे(वय ३५)रा सिद्धार्थ नगर टेंभुर्णी, जि  सोलापूर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सांगितले की, श्रीगोंदा फॅक्टरी परिसरात गांजा घेऊन काही लोक येणार असल्याची माहिती होती. त्यानुसार पथक तेथे थांबले होते. जगदंबा दूध उत्पादक संघाच्या इमारतीच्या पाठीमागील रस्त्यावरून दोघे अनोळखी जतानावडीसले आणि पोलिसांनी  त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानी हूल  दिली. 
पुढेवत्याना लगेच पकडले त्यावेळी त्यांच्याकडे गांजाचे दोन  पुडके सापडले.  सदर ४ किलो ५८०  ग्राम गांजा असून त्याची बाजारातील किंमत किंमत ४५ हजार ८०० रुपये आहे. त्या दोघांकडे असणारी दुचाकी एम एच ४५ व्ही २८४७  ही ४० हजार रुपये असा ऐकून ८५ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला. 

सदर आरोपींनी दिलेल्या माहितीवरून त्यांनी  कर्नाटक वरून हा गांजा आणला असून ते कारखाना परिसरात एका व्यक्तीला देण्यासाठी आले होते परंतु त्या व्यक्तीचा फोन बंद असल्यामुळे हे आरोपी हा गांजया घेऊन परत निघाले होते. आता गांजा घेणाऱ्या स्थानिक व्यक्तीचा पोलीस उपनिरीक्षक निलेश कांबळे शोध घेत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com