श्रीगोंद्याच्या म्हसे शिवारात बिबट्याने पाडला पाच शेळ्यांचा फडशा

संजय आ. काटे
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

यापूर्वीही बिबट्याचा वावर परिसरात असल्याबाबत माहिती वनविभागाला दिली होती.

श्रीगोंदे (जिल्हा नगर) : तालुक्यातील म्हसे शिवारात आज सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास म्हसे व वडगावशिंदोडी शिवेवरील पठारमळा परिसरात दत्तू किसन देवीकर त्यांच्या मालकीच्या शेळ्या चारण्यास गेले होते. त्यावेळी आलेल्या बिबट्याने चार शेळ्या जागीच देवीकर यांच्या समक्ष मारल्या.

पाचवी शेळी जखमी झाली पण तीही नंतर मरण पावल्याची माहिती कुकडी कारखान्याचे माजी संचालक संभाजी देवीकर यांनी दिली. यापूर्वीही बिबट्याचा वावर परिसरात असल्याबाबत माहिती वनविभागाला दिली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले असून दिवसा मालकाच्या समक्ष ही घटना घडल्याने लोकांमध्ये दहशत असल्याचे संभाजी देवीकर म्हणाले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar news shrigonda leopard eats goats