वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरूनच वाळू तस्करी

संजय आ. काटे
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

तहसीलदार महेंद्र माळी-महाजन म्हणाले, आमच्याकडेही वनखात्याच्या हद्दीतून वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेतय याबाबत संबधीतांनी सूचना करणार आहोत. तरीही काही कारवाई न झाल्यास जबाबदारी निश्चित करुन वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहे.

श्रीगोंदे (नगर) : तालुक्यातील नदीकाठी असणाऱ्या वनखात्याच्या क्षेत्रात वाळूचोरांनी मोठे अतिक्रमण केले असून, स्थानिक वनखात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यावरूनच ही तस्करी सुरू आहे. वनखात्याच्या हद्दीतील वाळू चोरतानाच त्यात येणारे झाडे बिनधास्त तोडण्याचे धोरण वाळूचोरांनी घेतले तरीही कारवाईऐवजी वनाधिकारी तडजोडीत गुंतले आहेत.

तालुक्यात वाळू चोरांनी हैदोस घालून महसूल व पोलिस प्रशासनाला हतबल केले आहेच आता त्यात वनविभागाचीही भर पडली आहे. महसूल व पोलिसांप्रमाणेच वनखात्याला खइासत घालण्याचे काम वाळू चोरांनी लिलया चालविले असून सर्वात कडक शिस्तीचे म्हणून धाक असणाऱ्या येथील वनखात्याच्या अधिकाऱ्यांची नदीला भेट होते मात्र ती कालवाईसाठी नव्हे तर वेगळ्याच कारणांसाठी गाजत आहे. 
गार,कौठे, पेडगाव, अजनूज, या भीमाकाठच्या गावांसह हंगेवाडी, बोरी, दाणेवाडी, राजापुर या घोडखालच्या नदीपात्रात वाळू कमी झाली आहे. मात्र त्याच काठी असणाऱ्या वनखात्याच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चोरांचे अतिक्रमण वाढले आहे. गार येथील वास्ताव मध्यंतरी सकाळने समोर आणले त्यानंतर काही कारवायाही झाल्या. एक गुन्हाही दाखल झाला मात्र त्यांनतर पुन्हा वाळूचोरांना सुळसुळाट वाढला आहे. सध्या तर वनखात्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी येथे आलेल्या वनक्षेत्रपाल शंकर पाटील यांची वाळू चोरांवर दहशत बसण्याऐवजी नदीपात्रात त्यांचीच ऊठबस वाढल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत त्यांना विचारले असता वनखात्याच्या हद्दीत वाळू उपसा होत नसून गस्तीसाठी तेथे सहा कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगून कारवाईपासून पळ काढला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nagar news shrigonda sand mafia forest officials hand