श्रीगोंद्यातील ZP शाळा रात्री कोसळली; आज गावकऱ्यांचे रास्ता रोको

संजय आ. काटे 
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

निंबोडी येथील शाळा इमारत पडल्याने तीन मुलांचा जीव गेल्याची घटना ताजी

श्रीगोंदे (जिल्हा नगर) : जिल्ह्यातील निंबोडी येथील शाळा इमारत पडल्याने तीन मुलांचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री घारगाव (ता. श्रीगोंदे) येथील प्राथमिक शाळेच्या काही खोल्या कोसळल्या.

गावकऱ्यांनी ही इमारत धोकादायक असल्याचे वारंवार कळविले मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. या खोल्या रात्री पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान प्रशासनाविरोधात गावकरी आज रास्तारोको आंदोलन करणार आहेत.

शाळा इमारत पडल्याने घारगाव येथील पालक अस्वस्थ झाले आहेत. तेथील गावकऱ्यांनी काही दिवसांपासून प्रशासनाला निवेदने देऊन शाळेची दुरवस्था कळविली होती. शाळेची इमारत स्वातंत्रपुर्व बांधली असल्याने ती धोकादायक बनली असतानाही संबधीत त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पंचायत समितीत अनेकवेळा पाठपुरावा करुनही उपयोग झाला नसल्याने शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. अनेक वर्षात घारगावात केवळ एकच खोली नव्याने बांधण्यात आली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

 

Web Title: nagar news shrigonde zp school building collapsed