छिंदम पोलिस ठाण्यात फिरकलाच नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नगर - छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला जामीन देताना येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दर रविवारी हजेरी लावण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, जिवाला धोका असल्याबाबतचा अर्ज दिल्यामुळे न्यायालयाने त्याला जवळच्या पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितल्याचे समजते. त्यामुळे छिंदम आज तोफखाना पोलिस ठाण्याकडे फिरकला नाही. नाशिक कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर छिंदम अज्ञातस्थळी रवाना झाला. सध्या तो आंध्र प्रदेशात असल्याची चर्चा आहे. आज रविवार असल्याने छिंदम हजेरी लावण्यासाठी कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, तो आज पोलिस ठाण्यात आला नाही.
Web Title: nagar news shripad chindam police station