लोकवर्गणी, वैयक्तीक खर्चातून रस्त्याचे काम

मार्तंडराव बुचुडे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

आम्ही गेली अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली होती मात्र सरकारी निधी येत नाही लोकांना जा-ये करणे कठीण होऊन बसले होते. त्यामुळे काही  स्वखर्च व लोकर्गणीतून हा रस्ता केला आहे. यापुढेही गावातील सुमारे 25 किलो मीटरचे रस्ते  करण्याचा आमचा मानस आहे.
- राहुल शिंदे. ऊपसरपंच रांजणगाव मशीद.

सुपे (नगर) : 17 निवडणुका जवळ आल्या की मतांसाठी गावात किंवा तालुक्यातील आपआपल्या भागात सरकारी निधीतून अगर स्वतः खर्च करून लोकांची अगर सामाजिक कामे करण्याची सवय साधरणपणे लोक प्रतिनिधींची असते. मात्र या सर्व प्रकाराला छेद देत, व लोकांच्या आडचणीच्या काळात सरकारी खर्चातून काम होण्याची वाट पहात बसण्यापेक्षा 50 टक्के लोक वर्गणी व 50 टक्के स्वतःच्या खिशातून पदरमोड करत रांजणगाव परीसरातील गावातून वस्तीवर जाणारे रस्ते करण्याचा चंग रांजणगावमशीद येथील ऊपसरपंच राहुल शिंदे यांनी केला आहे. 

रांजणगावमशीद हे गाव तालुक्याच्या एका टोकाला आहे. त्या मुळे हे गाव नेहमीच लोकप्रतीनिधींच्या विकासापासून दूर रहाते. या गावातून अस्तगावला जाणा-या रस्त्यावर सुमारे सातशेहून अधिक लोकवस्ती आहे. हा रस्ता जा ये करण्यासारखा राहीला नाही अनेक वर्षापासून हा रस्ता करण्याची मागणी सरकार दरबारी पडून आहे मात्र ती पुर्ण झाली नाही. लोकांना या रस्त्याने जा-ये करणेही कठीण झाले शेवटी ऊपसरपंच शिंदे यांनी मी स्वताः निम्मा खर्च करतो या परीसरात रहाणा-या लोकांनी निम्मा खर्च करा या अटीवर सरकारी निधीची वाट न पहाता आज या रस्त्याच्या कमाचा शुभारंभ करण्यात आला. 

गावातील बहुतेक लोक शेती करण्याच्या सोयीने वाडी वस्तीवर रहातात मात्र त्यांना धड रस्ते नाहीत. चारचाकी,  दुचाकी तर सोडाच पायी जाणे-येणेही कठीण झाले आहे. साधरणपणे लोकप्रतिनिधींची मानसिकता अशी असते की, निवडणुका आल्या की मतांसाठी कामे करण्याची पद्धत असते. मात्र यास छेद देत व सरकारी निधीची वाट न पहाता व लोकांनाही आपल्या कामात आपला सहभाग याची ज्या वस्तीवरील लोकांची मागणी येईल व जे लोक खर्चाच्या 50 टक्के वर्गणी भरण्यास तयार होतील त्यात 50 स्वताः रक्कम टाकून त्या वस्तीवरील रस्ते करण्यात येतील असे ग्रामसभेतच शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आज रांजणगाव ते अस्तगाव हा सुमारे सहा लाख रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम सुरू केले आहे. 

सरकारी निधी येईल तो पर्यंत वाट पहाण्यापेक्षा थेट कृतीतूनच शिंदे यांनी लोकसहभागातूनही मोठी कामे होऊ शकतात हा आदर्श  समाजाला दाखवून दिला आहे. 

आम्ही गेली अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली होती मात्र सरकारी निधी येत नाही लोकांना जा-ये करणे कठीण होऊन बसले होते. त्यामुळे काही  स्वखर्च व लोकर्गणीतून हा रस्ता केला आहे. यापुढेही गावातील सुमारे 25 किलो मीटरचे रस्ते  करण्याचा आमचा मानस आहे.
- राहुल शिंदे. ऊपसरपंच रांजणगाव मशीद.

Web Title: Nagar news social work