'भगवान हमारा रक्षण करता है... वो ही हमको तारेगा'

मार्तंडराव बुचूडे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

रूईप्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 13 गावे असून सात हजार सहाशे पाच घरे आहेत. या गावांमधील 32 हजार 82 लोकांचे आम्ही सर्वेक्षण केले आहे. त्यात 340 गरोधर माता व शून्य ते एक वर्ष वयोगटात 515 तर एक ते दोन  वर्षे वयोगटातील मुलांची संख्या 471 आहे. त्या पैकी फक्त 33 बालके व पाच गरोधर माता लसीकरणापासून विविध कारणांमुळे वंछीत राहील्या आहेत. आम्ही लवकरच शंभर टक्के लसीकरण पुर्ण करणार आहोत.
- डॉ. संदीप चोपडे, आरोग्य अधिकारी, रूईछत्रपती.

सुपे (नगर): 'भगवान हमारा रक्षण करता है, ऊसने ही हमे जनम दिया, वो ही हमको तारेगा. आप हमारे बच्चोंको सुई मत दो,' बच्चे बिमार गीरते असे म्हणत सरकारी आरोग्य अधिका-यांना दाद न देणा-या पालात रहाणा-या सुमारे दीडशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या भटक्या समाजाच्या 30 मुलांना आज विविध प्रकारचे लसीकरण गावातील विविध मान्यरांच्या सहकार्याने रूईछत्रपती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिका-यांना य़श आले.

सुपे-वाळवणे रस्त्यावर सुमारे दीडशेहून अधिक लोकसंख्या असणा-या भटक्या समाज्याच्या मुलांना विशेष इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात आले. गेली अनेक दिवसापासून आरोग्य अधिकारी डॉ. संदीप चोपडे, डॉ. प्रशांत वाघ व इतर कर्मचारी माळराणावर पालात रहाणा-या या भटक्या समाजाच्या लोकांना मुलांना लसीकरणाची गरज आहे, असे समजाऊन सांगत असत. मात्र ही मंडळी ऐकत नसत. लसीकरण केल्या नंतर सुई टोचलेल्या ठिकाणी गाठ येतो, मुलांना ताप येतो, आमची मुले आजारी पडतात अशी कारणे सांगत व लसीकरणास ही मंडळी सतत विरोधकरत असत.

यावर तोडगा म्हणून डॉ. चोपडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांनी गावातील ऊपसभापती दीपक पवार, हनिफ शेख, शकिल शेख या पालातील मुखीया निजाभाई सय्यद, युनुस सय्यद तसेच पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलिस खंडेराव शिंदे, शबाना तांबोळी, आरोग्यकर्मंचारी जे.एन. देवतरसे, यु.पी. ठोंबरे युपी, ए. एम. काळपुंड आदींच्या सहकार्याने त्यांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगीतले व शेवटी या मोहीमेस यश आले. लसीकरमाची ही मोहीम यशस्वी झाली या वेळी 30 मुलांचे व पाच गरोधर मातांचे लसीकरण करण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nagar news supe Various vaccination of 30 children of wandering community