नगरः जलसंधारणांच्या कामांमुळे टाकळी ढोकेश्वर पाणीदार

सनी सोनावळे
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

जलयुक्त शिवार व आदर्शगाव योजनेअंतर्गत वाहुन जाणारे पाणी अडवुन ते जमिनीत मुरल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे शेतकऱ्यांना पुढील काळात या पाण्याचा पिकांसाठी फायदा होणार आहे.हि योजना राज्याला दिशा दर्शक ठरणार आहे.
- सुनिता झावरे, सरपंच

टाकळी ढोकेश्वर (नगर): जलयुक्त शिवार व आदर्शगाव योजनेअंतर्गत झालेल्या कामांमुळे निवडुंगेवाडी व टाकळी ढोकेश्वर येथील बंधारे, छोटे मोठे तलाव तुंडुब भरुन गाव पाणीदार झाले आहे.

आदर्श ग्राम योजने मध्ये सलग समतल चर व शेतावरील बांध यांची कामे झाली यासाठी १ कोटी ४९ लक्ष निधी वापरण्यात आला. एकूण ९३१ हेक्टर क्षेत्रात कामे झालेली आहेत सिंचनाचे संरक्षित क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत यावर्षी १८० हेक्टर डोंगर परिसरावर खोल सलग समपातळी चरांचे कामे करण्यात आलेली आहेत. या कामांमुळे १४ कोटी लिटर पाणी जमिनीत मुरल्यामुळे परिसरात पाण्याच्या  पातळीत वाढ झालेली आहे.

सलग तीन ते चार वर्षे परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते त्यामुळे या कामांचा परिणाम जाणून आला नाही. परंतु, यावर्षी परीसरात जुन महीन्यात व गेल्या तीन दिवसापुर्वी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे ओढयांना पूर न येता या कामांमुळे सर्व पाणी जमिनीत मुरून नितळ पाण्याने परिसरातील छोटे बंधारे, विहिरी व तलाव भरले असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: nagar news takali dhokeshwar and water