संभाजी ठुबे यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

सनी सोनावळे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

टाकळी ढोकेश्वर (नगर): सणसवाडी (जि. पुणे) येथील माध्यमिक विद्यालयात कार्यरत असणारे संभाजी ठुबे (मूळ रा. कान्हुर पठार ता. पारनेर) यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

सोलापूर येथे हा पुरस्कार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी राज्यातील शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. ठुबे यांची पुणे जिल्ह्यातून निवड झाली आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बदल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या विज्ञान उपकरणांची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आहे. बस डे, स्वच्छ व सुंदर शाळा, शतकोटी, वृक्षारोपण, योग दिवस, रक्तदान, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव यासारख्या अनेक उपक्रमात ठुबे यांचा सहभाग असतो.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar news teacher sambhaji thube of state government award