नगरः कृषी सेवा केंद्राची खिडकी तोडून दीड लाखाच्या औषधांची चोरी

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथे चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास एका कृषी सेवा केंद्राची खिडकी तोडून आत प्रवेश करीत १ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या औषधांची चोरी केली. संगणक व सीसीटीव्ही कॅमेरा देखील चोरट्यांनी लंपास केला. गुरुवारी (ता. ३१) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

कोकणगाव येथे साहेबराव नाना जोंधळे यांच्या मालकीचे जनार्दन कृषी सेवा केंद्र आहे. जोंधळे हे रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. चोरट्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास सदर कृषी सेवा केंद्राची पाठीमागील खिडकी तोडून आत प्रवेश केला. दुकानातील १ लाख ५० हजार रुपये किंमतीची शेतीची औषधे, ८ हजार रुपये किंमतीचा संगणक व ५ हजार रुपये सीसीटीव्ही कॅमेरा मिळून १ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला, अशी तक्रार साहेबराव जोंधळे यांनी दिली. संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

Web Title: nagar news Theft of one and a half pounds in kokangaon