नगर : सुपे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

मार्तंडराव बुचुडे
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पोलिसांनी रात्रीची नियमित गस्त घलणे गरजेचे असून झालेल्या चो-यांचा तपास लावावा जर चो-यांचा तपास लागला तर चोरांवर वचक बसेल. तसेच पोलीस ठाणे औध्योगीक वसाहतीत गेल्याने गावातील पोलीस चौकी बंद असते तेथे नियमित पोलीस ठेवावेत पोलीसांच्या कामात सुधारणा झाली नाही तर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करावी लागेल.
- दिपक पवार, ऊपसभापती, पारनेर पंचायत समिती.

सुपे : सुपे परिसरात गेली काही दिवसापासून चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून अनेक भुरट्या चोऱयांना ऊत आला आहे. भुरट्या चोऱयांबरोबरच बुधवारी भरदिवसा बाजारातून दोन दुचाकी तर गुरुवारी रात्री दोन चार चाकी गाड्याही चोरीला गेल्याने परीसरात घबराहट निर्माण झाली आहे.

लोकांनी चोरट्यांचा मोठा धसका घेतला आहे. गावात पोलीसांची नियमित गस्त नसल्याने या चोऱया होत असून पोलीसांचे वचक राहीला नाही नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

याबाबत माहीती अशी की, काल सुपे येथील बाजार होता या बाजार तळावर गाडी लावून बाजार करण्यासाठी गेलेल्या कामरगाव येथील संतोष ढवळे यांची दुचाकी (एमएच 12 टीडब्लू 5285 ) भरदिवसा चोरीस गेली. तर दुसरीही दुचाकी चोरीस गेली मात्र तीचा मालक व क्रामांक समजू शकला नाही. तसेच रात्री शिवाजी एकनाथ दिवटे यांची (एमएच16 क्यू 8315) ही तवेरा कंपणीची जीप चोरीस गेली. तसेच संभाजी चिमणे यांची इंद्रायणी आपार्टमेंट येथून (एमएच16 आर.2426) रात्री दोन वाजणेच्या सुमारास इंडीका कार चोरीस गेली. एकाच दिवसात भर दिवसा दोन दुचाकी तर रात्री  दोन चारचाकी गाड्या चोरीस गेल्याने अनेक गाडी चालकांनी धसका घेतला आहे. या दोन चार चाकी गाड्या चोरून नेताना चोरट्यांनी त्यांच्याकडे असलेली इंडीका कार (एमएच 21 व्ही 75 ) ह येथेच सोडून दिली आहे. वरील गाड्या चोरीची फिर्याद गाडी मालकांनी सुपे पोलीसांत दिली आहे.

या गाडी चोरांनी येथील निलकंठ ज्वेलर्स हे दुकानही फोडण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी त्यांनी प्रथम लावलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे फोडले मात्र तेथे त्यांना चोरी करण्यात य़श आले नाही. त्याच वेळी तेथे कोणी तरी आल्याची चाहूल लागल्याने चोरटे पळून गेले असावेत.

सुपे परीसरात गेल्या आठ दिवसात अनेक ठिकाणी चोरट्यांनी चो-या करूण धुमाकुळ घातला आहे. अनेक भुरट्या चो-यांनाही ऊत आला आहे. या पुर्वीही येथील प्राथमिक व माध्यामिक शाळेचे गॅस सिलेंडर तसेच एल.ई.डी. चोरीस गेले आहेत. त्याच बरोबर येथील द-तमंदीरातील टाळ चोरण्याचेही धाडस चोरट्यांनी केले आहे. अध्याप एकाही चोरीचा तपास लावण्याची तसदी पोलीसांनी घेतली नाही. या पुर्वी म्हसणे येथील कारगील युद्धात शहीद झालेल्या एका जवानाचा आई वडीलांनी स्वखर्चातून पंचधातूचा ऊभारलेला पुतळाही चोरीस गेला आहे. त्याचाही अध्याप तपास लागला नाही. 

पोलिसांनी रात्रीची नियमित गस्त घलणे गरजेचे असून झालेल्या चो-यांचा तपास लावावा जर चो-यांचा तपास लागला तर चोरांवर वचक बसेल. तसेच पोलीस ठाणे औध्योगीक वसाहतीत गेल्याने गावातील पोलीस चौकी बंद असते तेथे नियमित पोलीस ठेवावेत पोलीसांच्या कामात सुधारणा झाली नाही तर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करावी लागेल.
- दिपक पवार, ऊपसभापती, पारनेर पंचायत समिती.

Web Title: Nagar news thief in Supe