दीड तपानंतर पावसाने बंधारे भरले !

हरिभाऊ दिघे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

जलयुक्तची कामे वरदान 
तळेगाव शिवारात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नालाबांध बंदिस्तीची कामे करण्यात आली. त्यामुळे पावसाचे पाणी त्यात अडून जमिनीत जिरले. जलयुक्तची कामे जलस्रोत बळकटीकरण होण्यास वरदान ठरली आहेत.

तळेगाव दिघे (जि. नगर) : दुष्काळसातत्य असलेल्या तळेगाव दिघे ( ता. संगमनेर ) शिवारात यंदा परतीच्या जोरदार पावसाने दिलासा दिला. तब्बल दीड तपानंतर पावसाच्या पाण्याने बंधारे तुडूंब भरले. त्यामुळे या भागात यंदा रब्बीची उभारणी होणार आहे.

तळेगाव शिवारात ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान तीन वेळा झालेल्या परतीच्या पावसाने दुष्काळाला ब्रेक दिला. भवानी माता मंदिर व वडमळा शिवारातील बंधाऱ्यांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा झाला. अनेक ठिकाणचे पाझर तलाव, नालाबांध व दगडी बंधारे भरले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे शिवारात चांगल्या प्रकारे पाणी जिरले.

गावठाण परिसरात देखील पाणीसाठे झाले. त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. विहिरी, कूपनलिकांना पाणी वाढले. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग सुरु झाली आहे. सन १९९९ नंतर तळेगाव भागात मोठा पाऊसच झाला नव्हता. तब्बल दीड तपानंतर ( १८ वर्षे ) जोरदार पावसाच्या पाण्याने बंधारे भरले असून शेतकरी सुखावला असल्याचे दिसत आहे.

जलयुक्तची कामे वरदान 
तळेगाव शिवारात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नालाबांध बंदिस्तीची कामे करण्यात आली. त्यामुळे पावसाचे पाणी त्यात अडून जमिनीत जिरले. जलयुक्तची कामे जलस्रोत बळकटीकरण होण्यास वरदान ठरली आहेत.

Web Title: Nagar news water storage in talegaon dighe