व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून राबविला सामाजिक उपक्रम

मार्तंडराव बुचुडे
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

त्या ग्रुपच्या माध्यमातून ते सतत वेगवेगळे सामाजिक ऊपक्रम राबवत आहेत. त्या माध्यामातून ते गेली दोन वर्षापासून गावकुसाबाहेर व पालात रहाणा-या कुटुंबाना दिवाळी निमित्त मिठाईचे वाटप करतात.

सुपे (नगर) : व्हॉटसअॅप ग्रुप फक्त टाईमपास, शुभेच्छा किंवा चाटींगसाठी वापरला जातो हा आरोप सुपे येथील सहारा ग्रूपने खोडून काढला आहे. सोशल मिडीयाचा चांगलाही वापर होऊ शकतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. या ग्रुपने पालात रहाणाऱ्या सुमारे दोनशेहून अधिक मुले, महिलांना मिठाईचे वाटप केले. ही मिठाई हातात पडल्यानंतर या मुलांचे व महिलांचे चेहेरे खुलले होते. 

येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी एक व्हॉटसएॅप ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून ते सतत वेगवेगळे सामाजिक ऊपक्रम राबवत आहेत. त्या माध्यामातून ते गेली दोन वर्षापासून गावकुसाबाहेर व पालात रहाणा-या कुटुंबाना दिवाळी निमित्त मिठाईचे वाटप करतात. केवळ ग्रुपवर दिवाळीपूर्वी ऊपक्रमाची माहीती दिली जाते लोक स्वखुशीने आपल्या इच्छेप्रमाणे मदतनिधी पाठवून देतात. यंदाही सुमारे 20 हजाराहुन अधिक रक्कम जमा झाली तीन ते चार दिवसात जमा झाली आहे. त्या रकमेतून या मिठाईचे दरवर्षी वाटप करण्यात येते. वाटप करताना राजकिय स्वरूप येणार नाही याची दक्षता घतेली जाते. जे या ग्रुपमध्ये आहेत अशाच मान्यवरांच्या हस्ते मिठाईचे वाटप केले जाते.

या वेळी जिल्हा परीषदेचे माजी ऊपाध्यक्ष सुजित झावरे, तहसीलदार स्वप्निल रावडे, राहुल शिंदे, महादेव महाराज काळे, युवराज पाटील,  सुनिल थोरात, सतीष पठारे, संतोष गायकवाड, सागर मैड, संतोष सरोदे, योगेश रोकडे, संचित मगर, नारायण नरवडे, गोरख दिवटे, प्रविण रावडे, अंकुश मगर आदी मान्यवर उपस्थित होते. या ग्रुपच्या मदतीने गेली वर्षभर एका निराधार व काम करू न शकणा-या महिलेला दोन वेळच्या जेवनाचा डबाही पुरवला जात आहे. लवकरच अनखी दोन महिलांना डबे देण्याचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar news whatsapp group social work