नगर: स्वाईन फ्लूने घेतला महिलेचा बळी 

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पिंपरणे (ता. संगमनेर) येथील वेणूबाई कोटकर या महिलेस स्वाईन फ्लू सदृश्‍य आजाराची लक्षणे आढळून आल्याने तिला दि. ५ ऑगस्ट रोजी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तेथून तिला नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील वेणूबाई जालिंदर कोटकर ( वय ५० ) या महिलेचा स्वाईन फ्लू आजाराने मंगळवारी नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूने संगमनेर तालुक्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या सहा झाली आहे.

पिंपरणे (ता. संगमनेर) येथील वेणूबाई कोटकर या महिलेस स्वाईन फ्लू सदृश्‍य आजाराची लक्षणे आढळून आल्याने तिला दि. ५ ऑगस्ट रोजी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तेथून तिला नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मंगळवारी उपचार सुरु असताना सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

यापूर्वीच संगमनेर तालुक्यात मार्च २०१७ ते जुलै २०१७ या कालावधीत स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने प्रियंका अशोक कांडेकर ( वय १६ रा. पळसखेडे ), विमल बंडू दिघे ( वय ५० रा. कोल्हेवाडी ), आशा राजेंद्र थोरात ( वय ४०, रा. जाखुरी ), शोभना राजेंद्र कासार ( वय ४५, रा. घुलेवाडी ), राजेंद्र सोमनाथ गाढे ( वय ४५ रा. सावरगावतळ ) आदी पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर स्वाईन फ्लूने वेणूबाई कोटकर यांचा सहावा बळी घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासमोर स्वाईन फ्लू रोखण्याचे आव्हान उभे आहे.

Web Title: Nagar news women death swine flu