भंडारदरा धरणात मुंबईतील तरुण बेपत्ता

शांताराम काळे
रविवार, 9 जुलै 2017

मुंबई येथील काही तरुण कळसुबाई शिखर सर केल्यानंतर भंडारदरा येथे निसर्गपर्यटन करण्यासाठी आले होते. ट्रेक केल्यानंतर आलेल्या थकव्यामुळे धरणाच्या पाण्यात हातपाय धुण्यासाठी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास उतरले. त्यात राजा मनोहरन (वय 27) हा तरुण सुद्धा पाण्यात उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाय घसरल्यामुळे पाण्यात पडला.

अकोले : भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये शनिवारी संध्याकाळी अंघोळीसाठी उतरलेला तरुण बेपत्ता झाला असून, आज (रविवार) सकाळीही तरुणाचा शोध सुरुच होता.

मुंबई येथील काही तरुण कळसुबाई शिखर सर केल्यानंतर भंडारदरा येथे निसर्गपर्यटन करण्यासाठी आले होते. ट्रेक केल्यानंतर आलेल्या थकव्यामुळे धरणाच्या पाण्यात हातपाय धुण्यासाठी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास उतरले. त्यात राजा मनोहरन (वय 27) हा तरुण सुद्धा पाण्यात उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाय घसरल्यामुळे पाण्यात पडला. संध्याकाळपर्यंत या तरुणाचा शोध लागला नव्हता.

अंधार पडल्यामुळे तरुणाला शोधण्यात अडथळा आला होता. तरी भंडारदरा येथील काही तरुणांनी राजूर पोलिसांच्या मदतीने राजेंद्र याचा शोध घेण्याचा प्रयत्न करुणही त्यात यश मिळाले नाही. या तरुणाचा शोध घेण्याची मोहिम ही पुन्हा सकाळी चालू करण्यात येणार असुन राजूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात पी. व्ही. कदम, एस. एस. शेरमाळे, व्ही. एम. गिरी, डी. आर. हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Nagar news youth drawn in Bhandardara Dam