नगरपंचायतीने दुर्लक्ष केलेल्या रस्त्याच्या कामाला सुरूवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

मलकापूर : येथील नगरपंचायतीने दुर्लक्षीत केलेल्या रस्त्याचे काम मळाईदेवी शिक्षण संस्थेने हाती घेतले आहे. संस्था, पालक व स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल यानी गोळा केलेल्या 4 लाख लोकवर्गणीतून हे काम करण्यात येणार आहे. स्टार इंग्लिश मिडीयम समोरील रस्त्याच्या मुरमीकरण व खडीकरण कामाचा आज उपस्थित पालकांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 

रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी संस्थेचे सचिव अशोकराव, डॉ. स्वाती थोरात, प्राचार्य आर डी जाधव, उत्तम जाधव, विश्वास चव्हाण, संदेश शहा, अल्ताफ शेख, दिनकर कांबळे, रघुनाथ जाधव, युवराज मोरे, सुभाष सुर्यवंशी, जमीर डांगे, प्रसन्न खबाले, सरिता शिंदे, स्वप्नाली कारंडे, नरगीस शेख, प्रदीप जाधव, बबन कोळेकर यांच्यासह पालक उपस्थित होते.

यावेळी आशोकराव थोरात म्हणाले, आमच्या संस्थेच्या शाळांकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यांकडे येथील नगरपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. गेली दहा वर्षात अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही एकदाही रस्याचे काम केलेले नाही. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील येणार म्हणून स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल कडे येणाऱ्या रस्त्याचे काम करण्यास पत्र दिले होते. तरीही काहीच काम केले नाही. शेवटी संस्था, शाळा व पालकानी गोळा केलेल्या लोकवर्गणीतून या रस्त्याचे मुरमीकरण व खडीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाटर, मुरमीकरण व खडीकरण कामाला अंदाजे चार ते साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे. ते लवकरच पूर्ण करणार आहोत.

यावेळी उपस्थित पालकांच्या हस्ते या रस्त्याच्या मुरमीकरण कामाचा शुभारंभ उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉ. स्वाती थोरात, जमीर डांगे यांच्यासह पालकांनी मनोगत व्यक्त केली. अनेक वर्षांपासून या शाळेच्या रस्त्याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर सी जाधव यांनी केले. तर डॉ. स्वाती थोरात यांनी आभार मानले. 

Web Title: Nagar Panchayat road neglected