नगर: पोलिंग बुथ एजन्टाचे मोबाईल जप्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नगर - राज्याच्या विधानपरिषदेतील नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे मतदान आज सकाळपासून सुरू झाले. या मतदानाची पाहणी नगर शहरात असलेल्या तीन केंद्रांवर करण्यासाठी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर सकाळी नऊ वाजता गेले. त्यावेळी त्यांना मतदान केंद्रातील उमेदवारांच्या बुथ प्रतिनिधींकडे मोबाईल आढळून आले. आनंदकर यांनी 16 मोबाईल जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत नेले. 

जिल्ह्यात 20 मतदान केंद्रे आहेत. यातील तीन मतदान केंद्रे नगर शहरातील रेसिडेन्सीअल महाविद्यालयात आहे. या तीन मतदान केंद्रांची पाहणी सकाळी नऊ वाजता आनंदकर यांनी केली. तर 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाहणी केली. जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत असलेल्या बुथवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या होत्या. 

तरीही काही बुथ 200 मीटरच्या आत असल्याच्या तक्रारी निवडणूक शाखेकडे आल्या आहेत. भाजपचे उमेदवार अनिकेत पाटील व भाऊसाहेब कचरे यांच्या बुथमध्ये चार पेक्षाही अधिक लोक असल्याचे पोलिसांना आढून आले. पोलिसांनी पोलिंग बुथमधील लोक कमी करण्याच्या सूचना दिल्या. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत केवळ 16 टक्‍के मतदान झाले. 

Web Title: nagar: Polling Buddha Agenta's Mobile Confiscation