भाजीपाल्याचा मालट्रक उलटला: तळेगावनजीक अपघात ; दोघेजण बचावले 

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

सदर मालट्रक संगमनेर येथून आग्रा येथे भाजीपाला घेवून चालला होता. अपघात झालेल्या घरानजीक मोठा खड्डा होता व सुदैवाने कुणी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली

तळेगाव दिघे ( जि. नगर) - संगमनेर - कोपरगाव रस्त्याने भाजीपाला घेवून चाललेला मालट्रक उलटत अपघातग्रस्त झाला. या अपघातातून चालक व क्लीनर बचावले. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव दिघे येथील आरामपूर खळवाडीनजीकच्या वळणावर ही अपघाताची घटना घडली.

संगमनेर येथून फ्लॉवर घेवून मालट्रक ( क्र. युपी ८० बीटी ३०८१ ) हा कोपरगावच्या दिशेने चालला होता. दरम्यान तळेगाव दिघे नजीकच्या वळणावर मालट्रक आला असता चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्याकडेला असणाऱ्या घरानजीक उलटत अपघातग्रस्त झाला. चालक प्रवीण ठाकूर व क्लीनर राजबीरसिंग रतनसिंग ( रा. समराबाद, आग्रा ) हे अपघातातून बचावले. सदर मालट्रक संगमनेर येथून आग्रा येथे भाजीपाला घेवून चालला होता. अपघात झालेल्या घरानजीक मोठा खड्डा होता व सुदैवाने कुणी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Web Title: nagara news; accident near talegaon