नागेश काटगावकरला मिळाला अंतरिम अटकपूर्व जामीन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

सोलापूर - फायनान्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून घेऊन कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणात मुख्य आरोपी शेखर काटगावकरचा भाऊ नागेश काटगावकर याचा अंतरिम अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला. 

सोलापूर - फायनान्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून घेऊन कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणात मुख्य आरोपी शेखर काटगावकरचा भाऊ नागेश काटगावकर याचा अंतरिम अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला. 

व्यापारी सचिन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेखर काटगावकरसह त्याची पत्नी सुकेशनी आणि भाऊ नागेश या तिघांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात शेखर व सुकेशनी काटगावकर या दोघांना यापूर्वीच अटक झाली आहे. नागेशने अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबर या कालावधीत तपास अधिकाऱ्यांकडे हजेरी लावण्याच्या अटीवर नागेशला जामीन मंजूर झाला. पुढील सुनावणी 5 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. 

या खटल्यात मूळ फिर्यादीतर्फे ऍड. रितेश थोबडे, ऍड. प्रियला सारडा, ऍड. सचिन इंगळगी यांनी तर आरोपीतर्फे ऍड. अशोक मुंदर्गी, सरकारतर्फे ऍड. स्वप्नील पेडणेकर यांनी काम पाहिले. 

Web Title: Nagesh katagavakara received interim anticipatory bail