नागनाथांच्या यात्रेत गुरू-शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा

maharaj
maharaj

मोहोळ (सोलापूर) : गुरू -शिष्य पंरपरेतील सुमारे सातशे वर्षापासुन चालत आलेला अतुट भेटीचा नयनरम्य सोहळा हजारोच्या साक्षीने रविवारी (ता .२२) मोहोळ येथील नागनाथांच्या यात्रेत खर्ग तिर्थावर पार पडला.      

येथील ग्रामदैवत श्री नागनाथांच्या यात्रेतील मुख्य गणासह खर्गेचा मिरवणुक पालखी सोहळा रविवार ता. २२ रोजी सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत संपन्न झाला.

दिल्ली दरवाजा, खर्गतिर्थ, काकडे पार, मुंगीचा धोंडा या ठिकाणच्या भाकणुका पाहण्यासाठी भावीकांनी प्रचंड गर्दी झाली होती. केंद्रातील स्थीर सरकारसह, समाधानकारक पाऊस, व जनावरांना मुबलक चाऱ्याची भाकणूक यावेळी झाली.   

खर्ग तिर्थावर नागनाथांचे मुख्य मानकरी गुरु राजेंद्र खर्गे महाराज व शिष्य हेग्रसाचे वंशज अरूणबुवा मोहोळकर यांच्या भेटीचा नयनरम्य सोहळा संपन्न झाला. या यात्रेतील मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्यक्ष शंकराचा अवतार मानलेल्या या नागनाथांच्या यात्रेत ' शेख नसरुद्दीन बादशहा की दो चिराऊ दिन ', हर बोला हरहर' असा जयघोष केला जातो. म्हणजेच सुमारे सातशे वर्षापुर्वी या देशात धार्मिक विध्वंस होत असताना नागेश संप्रदायात मात्र हिंदु - मुस्लीम अतिशय गुण्यागोंवदांने एकत्र नांदत होते. तर चार्तुवर्ण व्यवस्थेला छेद देत जाती जातीतील श्रेष्ठ कनिष्ठतेला थारा न देता सामाजिक समतेचे प्रतिक असलेल्या या यात्रेत हिंदु धर्मातील सर्व जातींना वेगवेगळ्या प्रकारची देवाची सेवा करण्याची संधी मानाच्या माध्यमातुन अखंडीतपणे दिली जाते. त्यामुळे श्री नागनांथाचा महिमा आधुनिक युगातील सोशल मिडीयाच्या माध्यमाद्वारे कोसोदुर  समजू लागल्यामुळे नागेश भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच  होत चालली आहे.          

लाखोंच्या संख्येने येणाऱ्या या यात्रेत यावर्षी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देवस्थान पंच कमेठी, विश्वस्त, यांच्याशी चर्चा करून यात्रेचे  सुनियोजन केल्यामुळे असंख्य भक्तांना यात्रेतील आनंद द्विगुणीत करता आला.

कडक उन्हाच्या झळया बसत असताना यात्रेकरूसाठी  शहरातील मुस्लीम बांधवासह कै पद्मीनी चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ अविनाश गोडसे,  सतीश गोडसे या बंधुंसह प्रभाकर कुलकर्णी, आयुब इनामदार यांनी  यात्रेकरूसाठी  थंड पाण्याची  तर  हरी ओम मित्र मंडळांने  थंड मठ्याची  सोय केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com