नागपंचमी उत्सवासाठी शिराळा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

शिराळा - येथे नागपंचमीसाठी नगरपंचायत व प्रशासनातर्फे तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (बुधवारी) साजऱ्या होणाऱ्या नागपंचमी उत्सवासाठी आज (मंगळवारी) वन विभाग व पोलिस असे एकूण ३६५ अधिकारी व  कर्मचारी शिराळ्यातून संचलन करणार आहेत.

शिराळा - येथे नागपंचमीसाठी नगरपंचायत व प्रशासनातर्फे तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (बुधवारी) साजऱ्या होणाऱ्या नागपंचमी उत्सवासाठी आज (मंगळवारी) वन विभाग व पोलिस असे एकूण ३६५ अधिकारी व  कर्मचारी शिराळ्यातून संचलन करणार आहेत. ६३ नागमंडळांवर ९ पथकांच्या माध्यमातून १०० वन व पोलिस कर्मचारी लक्ष ठेवणार आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाईचे संकेत प्रशासनातर्फे  देण्यात आले आहेत. 

शिराळ्यात पंचमीनिमित्त बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, खिसेकापू विरोधी ४ पथके, गुंडाविरोधी विशेष पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण अशी विविध पथके, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

नागपंचमी उत्साहात साजरी करण्यासाठी नागमंडळे सरसावली आहेत. यावेळी मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर देण्यात येणार आहे. पाळणे, खाद्य पदार्थाचे व इतर दुकानांची गर्दी केली आहे. यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये म्हणून शिराळा आगाराच्या वतीने  ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. वनविभागाने  १६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यात १ उपवनसंरक्षक, २ विभागीय वनाधिकारी,४ सहायक वनसंरक्षक, १० वनक्षेत्रपाल, २३ वनपाल, ४५ वनरक्षक, ८० वनमजूर यांचा समावेश आहे. नाग मंडळावर लक्ष ठेवण्यासाठी १०० कर्मचाऱ्यांची ९  पथके नेमली आहेत. त्यात १ वनक्षेत्रपाल, १ वनपाल, १ वनरक्षक, २ वनमजूर, २ पोलिस कर्मचारी, १ सर्पमित्र, १ छायाचित्रकार यांचा समावेश आहे. प्रबोधनासाठी १० ठिकाणी पथनाट्य करण्यात येणार आहे. १० गस्ती पथके आहेत.

आरोग्य विभागाची सात पथके
आरोग्य विभागातर्फे पाडळी रोड तळीचा कोपरा, कोकरूड रोड एसटी स्टॅंड, शिराळा बस स्थानक, यादव हार्डवेअर, नगरपंचायत, व्यापारी असोसिएशन हॉल, मांगले रोड या सात ठिकाणी आरोग्य पथके नेमली आहेत. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत वितरणने १० ठिकाणी पथके नेमली आहेत. मिरवणूक मार्गावरील स्वच्छता व औषध फवारणीचे काम गतीने  सुरू आहे.

Web Title: NagPanchami Festival Shirala