नागठाणे भविष्यात ‘ॲग्रो व्हिलेज’ बनावे - राज्यपाल श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

नागठाणे - नागठाणे हे गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ झाले आहेच. आता या गावाने ‘ॲग्रो व्हिलेज’ म्हणून नावारूपास येण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे मत सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

येथील ग्रामपंचायतीस श्री. पाटील यांनी आज भेट दिली. या वेळी सारंग पाटील, यशवंत साळुंखे, बाळकृष्ण साळुंखे, सरपंच विष्णू साळुंखे आदी उपस्थित होते. अलीकडच्या काळात नागठाणे गावाने आपला कायापालट घडविला आहे. गावाने विकासाच्या योजना प्रभावीपणे 
राबविल्या आहेत.

घनकचरा व्यवस्थापन, गांडूळखत प्रकल्प कौतुकास्पद आहे. गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’ पुरस्कार पटकाविला आहे. 

आता हे गाव ‘ॲग्रो व्हिलेज’ बनावे, असेही श्री. पाटील यांनी नमूद केले.
कार्यक्रमास नारायण साळुंखे, संजय साळुंखे, बाळासाहेब साळुंखे, विश्वासराव ठोके, अधिकाराव साळुंखे, सचिन पवार, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मनोहर साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. 

अजित साळुंखे यांनी आभार मानले. या वेळी त्यांनी ग्रामपंचायतीने राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, गांडूळखत प्रकल्पास भेट दिली. 

Web Title: nagthane agro village shrinivas patil