नाट्यक्षेत्रातील कलावंतांसाठी बालगंधर्व हे संत तुकारामांसारखेच होते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

मोहन जोशी, सुबोध भावे यांचे प्रतिपादन
नागठाणे - नाट्यक्षेत्रातील बालगंधर्वांचे कार्य अतुलनीय आहे. सध्याच्या काळात त्यांची तुलना कोणत्याही कलाकाराशी होऊ शकत नाही. नाट्यक्षेत्रातील कलावंतांसाठी बालगंधर्व हे संत तुकारामांसारखेच होते.

मोहन जोशी, सुबोध भावे यांचे प्रतिपादन
नागठाणे - नाट्यक्षेत्रातील बालगंधर्वांचे कार्य अतुलनीय आहे. सध्याच्या काळात त्यांची तुलना कोणत्याही कलाकाराशी होऊ शकत नाही. नाट्यक्षेत्रातील कलावंतांसाठी बालगंधर्व हे संत तुकारामांसारखेच होते.

कलाक्षेत्रातील कळस असलेल्या बालगंधर्वांच्या नावाचा पुरस्कार आजवरच्या आम्ही केलेल्या कलेचा मोठा सन्मान मानतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व सुबोध भावे यांनी केले.

नागठाणे (ता. पलूस) येथे नटसम्राट बालगंधर्व स्मारक समितीतर्फे नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना, तर नटसम्राट बालगंधर्व युवा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. आमदार पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते. खासदार संजय पाटील प्रमुख पाहुणे होते. मोहन जोशी यांना सन्मानपत्र, बालगंधर्वांची प्रतिमा व 51 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. सुबोध भावे यांना सन्मानपत्र, प्रतिमा व 25 हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

मोहन जोशी म्हणाले, 'प्रत्येक कलाकार मोठा होण्यामागे दिग्दर्शकाबरोबर सहकलाकार व प्रेक्षकांचा मोठा वाटा असतो. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार इतर पुरस्कारांपेक्षा फार उंचीचा आहे. या पुरस्काराचे ऋण मी कधीही विसरणार नाही. "मोरूची मावशी'ची भूमिका मी बालगंधर्वांच्या प्रेरणेतूनच साकारू शकलो.''

सुबोध भावे म्हणाले, 'बालगंधर्वांची भूमिका मी यशस्वीरीत्या पार पाडली. बालगंधर्व ही उपाधी लोकमान्य टिळक यांनी दिली. त्या टिळकांची भूमिकादेखील मी केली, हे माझे भाग्य समजतो.''

Web Title: nagthane news mohan joshi talking