नाईकबा यात्रेला बैलगाडीतूनच जाणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

ढेबेवाडी - सुमारे शंभर-सव्वाशे किलोमीटरचे अंतर कापत नाईकबाच्या दर्शनासाठी कुटुंबीयांसह बैलगाडीतून येणाऱ्या भाविकांची संख्या आजही कायम आहे. प्रत्येक यात्रेत विविध भागांतील भाविक परंपरेनुसार बैलगाडीतून दाखल झाले आहेत. 

ढेबेवाडी - सुमारे शंभर-सव्वाशे किलोमीटरचे अंतर कापत नाईकबाच्या दर्शनासाठी कुटुंबीयांसह बैलगाडीतून येणाऱ्या भाविकांची संख्या आजही कायम आहे. प्रत्येक यात्रेत विविध भागांतील भाविक परंपरेनुसार बैलगाडीतून दाखल झाले आहेत. 

नाईकबा देवाच्या यात्रेत उद्या (शनिवारी) ‘श्रीं’च्या नैवेद्याचा दिवस आहे. रविवारी (ता. २) पहाटे पालखी सोहळा आहे. यात्रेस बैलगाडीतून कुटुंबीयांसह येणाऱ्या भाविकांची संख्याही येथे आहे. अनेक कुटुंबात परंपरेने चालत आलेला वारसा जोपासला आहे. यात्रेपूर्वी दोन दिवस अगोदर भाविकांनी भरलेल्या बैलगाड्या ‘चांगभलं’चा गजर करत विभागात दाखल होतात. डोंगरपायथ्याला मोकळ्या शिवारात त्यांचा मुक्काम असतो. बहुतांश बैलगाड्या या कोल्हापूूर जिल्ह्यातील आहेत. यात्रेस निघण्यापूर्वी चार दिवस अगोदर भाविकांची त्यांच्या गावात बैठक होते. त्यात प्रवासाचे नियोजन होते. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ग्रामदैवताचे दर्शन घेऊन गाड्या निघतात. महामार्गावरील गावात मुक्काम करून दुसऱ्या मुक्कामाला गाड्या श्री नाईकबा डोंगर पायथ्याला पोचतात. तिथे त्यांचा तीन दिवस मुक्काम असतो. नैवेद्याच्या दिवशी डोंगरमाथ्यावर सवाद्य मिरवणुकीने ‘श्रीं’ना नेवैद्य वाहण्यास जाताना सोबत सजविलेले त्यांचे बैलही असतात. पालखी सोहळा झाल्यानंतर बैलगाड्यांतून आलेल्या भाविकांचा परतीचा प्रवास सुरू होतो.

लहाणपणी बैलगाडीतून यात्रेला यायचो. गाडी हाकत कुटुंबीयांसमवेत येतोय. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली परंपरा अबाधित ठेवणे व भक्ती यामागे आहे.
- तानाजी पाटील, भादुले- कोल्हापूर

Web Title: naikaba pilgrimage in bullockcart