मुरगूडचे उपनगराध्यक्ष मेंडके यांचा राजीनामा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मुरगूड - येथील नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नामदेवराव तुकाराम मेंडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्याकडे आज दिला. दरम्यान, पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी सुहास खराडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्‍यता आहे. 

उपनगराध्यक्ष मेंडके यांचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांनी गटनेते खासदार संजय मंडलिक यांच्या सूचनेनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता या पदावर कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता आहे. महिन्याभरापूर्वी स्वीकृत नगरसेवक शिवाजीराव चौगुले व दीपक शिंदे यांनी देखील कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे नगरपालिकेत नव्याने दोन स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. यामध्ये माजी नगरसेवक सुहास खराडे व बाजीराव गोधडे यांची वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

दरम्यान, या तिन्हीही निवडी शनिवारी (ता. 13) किंवा रविवारी (ता. 14) होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. अनंत चतुर्दशीनंतर विधानसभेची आचारसंहिता लागू शकते. आचारसंहिता लागली तर या निवडी दोन महिने पुढे जाऊ शकतात. त्यासाठी तातडीने या निवडी करण्याच्या हालचाली पालिका वर्तुळात सुरू आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Namdevrao Mendke resign from Murgud Vice President