भोसे: नंदेश्वर पोलिस ठाणे सुरु होण्याची गरज; ग्रामस्थांतून नाराजी

Nandeshwar police station needs to be started at Bhose
Nandeshwar police station needs to be started at Bhose

भोसे - मंगळवेढा पोलिस ठाण्यावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी जवळपास 39 गावांसाठी मंजूर झालेल्या प्रस्तावित नंदेश्वर पोलिस ठाण्यासाठी दक्षिण भागातील ग्रामस्थांनी शासकीय अनुदानाची वाट पाहता लोकवर्गणीतून केवळ चारच महिन्यात सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांची नंदेश्वर आउट पोस्ट ला बदली झाली. यांच्या पुढाकारातून नंदेश्वर येथे पोलिस ठाण्याची भव्य इमारत दिमाखात उभी राहिली असली तरी अद्याप येथे रितसर पोलिस ठाणे सुरू होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कोणत्याच हालचाली होत नसल्याने दक्षिण भागातील ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

दक्षिण भाग सांगली व सोलापूर जिल्ह्याचे सीमेवर तसेच कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यालगत असलेने या परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक गुटख्याची तस्करी तसेच इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालते या परिसरात गुन्हे घडले की गुन्हेगार विजापूर जिल्हयात पलायन करतात. मंगळवेढा हे 40 ते 45 कि. मी. अंतरावर असलेने एखादी घटना किंवा गुन्हा घडलेनंतर घटनास्थळी पोलिस पोहचेपर्यंत आरोपी पलायन करतात यासाठी तसेच हुन्नुर येथील बिरोबा व हूलजंती यात्रेसाठी वर्षातून चार पाच वेळा कर्नाटक व महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येनं येणारे भाविक व त्यांची सुरक्षितता यासाठी दक्षिण भागात मध्यवर्ती ठिकाणी नंदेश्वर येथे मंजुरीही मिळताच ग्रामपंचायतीने जागा देखील देऊ केली. परंतु नेहमीच मंगळवेढ्यात बसून कारभार हाकण्याची सवय असलेल्या अधिकाऱ्यांनी बांधकामांसाठी प्रयत्न केले नाहीत. 

गेल्या सहा महिन्यापूर्वी हजर झालेल्या विधातेनी या दक्षिण भागातील ग्रामस्थांची गरज ओळखत प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित ग्रामस्थ प्रगतशील शेतकरी यांचेशी संवाद साधून बांधकामास मदत करण्याचे आवाहन केले. अवघ्या चार ते पाच महिन्यात नंदेश्वर गोणेवाडी रस्त्यावर प्रस्तावित नंदेश्वर पोलिस ठाण्याची भव्य व सर्व सोयींनी युक्त अशी इमारत उभी राहिली आहे.  

दक्षिण भाग आतिशय संवेदनशील व सीमावर्ती भागातील ग्रामस्थांना मंगळवेढ्यास जाने खूपच लांब पडणार असलेने नंदेश्वर येथून दक्षिण भागातील 39 गावासाठी कारभार पाहाणेस एक चांगली इमारत आता उभी राहिली असलेने नंदेश्वर आउट पोस्टला पोलिस ठाण्याचा दर्जा देण्याची मागणी दक्षिण भागतील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधीतून होत असून गेली काही वर्षे दक्षिण भागातील जनतेचा हा जिव्हाळ्याचा व संरक्षणाचे दृष्टीने महत्वाचा असलेला प्रश्न महेश विधाते सारख्या अधिकाऱ्याने पोलिस जर जनतेपर्यंत पोहचले तर प्रत्येक गोष्टीस शासकीय अनुदानाची गरज लागत नाही, हे दाखवून दिले असलेने जिल्हा पोलिस प्रमुखांनी मंगळवेढा दक्षिण भागातील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन त्यांच्याच एका अधिकाऱ्याने जनतेच्या सहकार्याने अगदी अल्प कालावधीत उभ्या केलेल्या प्रस्तावित नंदेश्वर पोलिस ठाण्यास भेट देऊन या पोलिस ठाण्यातून लवकरात लवकर अधिकृतपणे कारभार सुरू करावा, अशी मागणी दक्षिण भागातील ग्रामस्थांतून होत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com